मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेवरून सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या विजयी आमदारांसोबतच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ज्यात शिवसेनेने भाजपवर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपला इशारा दिला. एकीकडे राज्यात कमी जागा मिळूनही वाढलेली शिवसेनेचे बार्गेनिंग पॉवर, राष्ट्रवादीला मिळालेले सन्मानजनक यश आणि भाजपची झालेली निराशा पाहता राज्यात नेमकं कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या या चढाओढीतबाबत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले ?
- अल्प बहुमतातले सरकार बनले आणि ते पडले तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल.
- मॅन्डेड भाजप-सेना सरकारला आहे. बंडखोरीमुळे अनेक जागा पडल्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करणे आवश्यक आहे.
- शिवसेनेच्या मागणीचा विचार व्हावा. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळेल असे वाटत नाही. मंत्रिमंडळात अर्ध्या जागा, केंद्रात आणखी एक मंत्रीपद आणि राज्यात चांगली खाती शिवसेनेला मिळू शकतात.
- देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व काही होऊन जाईल.
- भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी स्वीकारणार नाहीत, फार तर उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल.
- भाजपसाठी १०५ जागांवर सत्तास्थापनेचा दावा करणे कठीण आहे.
- भाजप शिवसेनेचे अडले तर भाजपला राष्ट्रवादी पाठींबा देऊन सरकार स्थापन होऊ शकेल. पण ते योग्य नाही.
- शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठिंबा देऊनही सरकार होऊ शकते.
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये.
- काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला नाही तर शिवसेना-राष्ट्रवादी सरकार होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देऊन सरकार बनवू शकते. शिवसेनेसोबत शक्य झाले नाही तर भाजपापुढे पहिला पर्याय तोच उपलब्ध असू शकतो.
- राज्यात पुन्हा निवडणुकांची परिस्थिती उद्भवल्यास भाजप शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. पुन्हा निवडणुका झाल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धूसर आहे.
- अपक्षांना मंत्री पदे मिळाली नाहीत तरी मतदारसंघातील कामे जलदगतीने होण्यासाठी त्यांनी महायुतीसोबत राहिले पाहिजे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.