HW News Marathi
राजकारण

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

मुंबई | शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी सुपूर्द केलेला मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे आता राज्याच्या आरोग्य खात्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजीच संपली होती. त्यामुळे ते मंत्रीपदी राहू शकत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.

मी पक्षावर नाराज असून मला पक्षाकडून नव्या जबाबदारीची अपेक्षा असल्याचे स्पष्ट करत दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेत मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र, अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याच्या आरोग्य मंत्रिपदाचा अधिभार सोपविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार निवडणूक लढविणार नाही | शरद पवार

News Desk

सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरुच ठेवावे, रोहित पवारांची मागणी

News Desk

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात होणार फैसला

Aprna