HW News Marathi
राजकारण

आता सुज्ञ जनता राष्ट्रवादीसारख्या बुडत्या पक्षाला आधार देणार नाही !

बीड | “बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नाव पुसायला निघाली आहेत”, असा आरोप महिला विकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. “बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नाव पुसायच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांनी यासाठी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांचा हा उद्देश साध्य होणार नाही. कारण येथील जनतेने त्यांच्यावर पोटच्या लेकरासारखे प्रेम केले आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. “राष्ट्रवादी पक्ष आता संपला आहे. आता सुज्ञ जनता या बुडत्या पक्षाला आधार देण्याचे काम करणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नाटकं चांगली करतात”, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या.

“राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार यावे यासाठी आता मला महाराष्ट्रभर फिरायचे आहे. माझ्या या विजयासाठीची लढाई मात्र तुम्हाला लढायची आहे. तुम्ही माझे सैनिक आहात. म्हणूनच मी माझी ही लढाई तुमच्या स्वाधीन करत आहे”, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी जनतेला घातली आहे. त्याचप्रमाणे, “बारामतीतील मंडळी मुंडे साहेबांचे नाव पुसायला निघाली असली तरीही त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना ते सध्या होणार नाही. कारण येथील जनतेने मुंडे साहेबांवर आपल्या पोटच्या लेकरासारखे प्रेम केले आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझी लढाई कोणत्याही व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे. मी तुमच्या सेवेसाठी लढत आहे. मात्र, माझे विरोधक स्वतःच्या अस्तित्त्वासाठी लढत आहेत. राष्ट्रवादी पक्ष आता संपला आहे. आता सुज्ञ जनता या बुडत्या पक्षाला आधार देण्याचे काम करणार नाही. अशा पक्षाचे नेते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात येऊन फोडाफोडीचे व जातीपातीचे राजकारण करतात. राष्ट्रवादीचे नेते नाटकं चांगली करतात. या पक्षाने आपली सत्ता असताना परळी व बीडसाठी एक तरी उद्योग आणला का ? जे लोक स्वतःचे होऊ शकले नाहीत, ते दुस-यांचे कधी होणार ?”, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणुका

News Desk

कंपास पेटीच्या साहाय्याने ८ वर्षीय मुलीने शिकविला ‘राफेल’ धडा

News Desk

राज ठाकरे ‘या’ मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना साथ देण्यास तयार,थेट मुख्यमंत्री,शरद पवारांना पत्र ….

News Desk