HW Marathi
राजकारण

आता ममतांसाठी ‘ही’ तज्ञ व्यक्ती आखणार निवडणुकांची रणनीती

नवी दिल्ली | निवडणुकांचे रणनीतीकार आणि जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या मदतीला धावून आले आहेत. प्रशांत किशोर हे आता ममता बॅनर्जी यांच्याकरिता काम करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांच्यात गुरुवारी (६ मे) चर्चा झाली. या चर्चेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकांचे रणनीतीकार अशी प्रशांत किशोर यांची विशेष ओळख आहे. यंदाच्या लोकसभेत टीएमसीला चांगलाच फटका बसला आहे. मात्र, आता टीएमसी प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा फायदा कसा करून घेणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

प्रशांत किशोर हे एका महिन्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात करतील. यंदाच्या लोकसभेत टीएमसीला बसलेला धक्का ममता बॅनर्जी यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी आतापासूनच जोरदार तयारीला लागल्या आहेत. म्हणूनच निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तीची निवड केली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा ममता बॅनर्जींना कसा फायदा होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

#LokSabhaElections2019 : माझी निवडणूक लढविण्याची इच्छा कायमच आहे !

News Desk

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन, महाराष्ट्राचे सुपुत्र श्रीकांत दातार यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव

News Desk

सरकारने जनतेच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी | अजित पवार

News Desk