HW News Marathi
राजकारण

आता या स्थानकाचे ही नाव बदलणार

मुंबई । बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्रामध्ये दीर्घकाळ वास्तव्य होते, त्यामुळे वांद्रे स्थानकाला बाळासाहेब ठाकरे टर्मिनस नाव देण्यात यावे,अशी मागणी भाजपच्या खासदार पूनम महाजन केली आहे. पूनम यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. २०१७ मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूनम महाजन यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला होता.

सध्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावाबाबत दखल घेतली असून, राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवून घेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे, असे आश्वासन गोयल यांनी पूनम यांना दिले आहे. महाजन यांनी ज्यावेळी पीयूष गोयल यांची यासंदर्भात भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी हा प्रस्तावावर राज्य सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर महाजन यांनी देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंह यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे.

Related posts

न्या. गोयल यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हटवा

News Desk

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

Aprna