HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना जामीन मंजूर झालेला आहे. रविकांत तुपकर यांना बुलढाना न्यायालयीने अटी-शर्थीसह जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यानंतर अकोला न्यायालयाने रविकांत तुपकर जामीन मंजूर केला होता. रविकांत तुपकर यांची आज सायंकाळपर्यंत सुटका होण्याची शक्यता वर्तवली जाते.

रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीव शनिवारी (11 फेब्रुवारी) रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता.  यावेळी पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या 25 सहकार्यांना पोलिसांनी अटक केले होते. यानंतर रविकांत तुपकरांना न्यायालयाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

राज्य आणि केंद्र सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. गेल्या तीन महिन्यापासून शेतकर रस्त्यावर उतरत आहेत. वेळोवेळी सरकारने आमच्यासोबत चर्चा करून बैठका घेतल्या आणि शेतकऱ्यांन आश्वासन दिले. सरकारनी आमची फसवणूक केली आहे. सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळत नाही. तर 80 ते 70 टक्के कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.

 

Related posts

नांदेड येथे डीबीटीद्वारे खत विक्रीचे प्रशिक्षण संपन्न  

News Desk

वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प’ कालबद्ध वेळेत पूर्ण करणार!  – देवेंद्र फडणवीस

Aprna

सिद्धू पाकिस्तानचे एजंट | हरसिमरत कौर

News Desk