HW News Marathi
राजकारण

आमच्या घरातून केवळ मीच निवडणूक लढवणार | सुप्रिया सुळे

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘पार्थ आणि शरद पवार दोघेही नव्हे तर आमच्या घरातून केवळ मीच निवडणूक लढवणार आहे’ असे म्हटले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदासंघातून तर शरद पवार पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आमची मावळ मतदारसंघाची बैठक झाली आहे. त्यात पार्थने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र पुढे काय होईल, हे मी आता सांगू शकत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. यावेळी उदयनराजेंच्या उमेदवारीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणी विरोध केला ते मला माहित नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच आम्ही उमेदवारी देऊ.” आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा असून लोकांना निवडणूक लढवायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बारामतीला धडक मारुन काय होणार? “, अजित पवारांचा भाजपला सवाल

Aprna

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसला दिले उत्तर; पत्रात म्हणाले…

Aprna