HW News Marathi
राजकारण

भाजप विरोधात एकजूट रॅलीत विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली | भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी विरोधी पक्षांचे आज (१९ जानेवारी) पक्षांचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बनर्जी यांनी कोलकाता येथील बिग्रेड मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन, भाजपाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव, डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन आदी नेते उपस्थित होते. ही रॅली कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित केली असून येथे मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती आहे. या रॅलीत २० हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. भाजप सरकारविरोधात प्रत्येक ठिकाणी अशा रॅली आयोजित करायला हव्यात, असे शौरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दीदींच्या एकजूट रॅलीला पाठिंबा दिला आहे.

Related posts

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत !

News Desk

शशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच !

News Desk

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात उद्या अंतिम निर्णय”, अजित पवारांची माहिती

Aprna