नवी दिल्ली | “अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढून दाखवा,” असे आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला दिले आहे. “तुमच्याकडे सत्ता आहे. मग प्रत्येक वेळी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढण्याची धमकी का देता ? तुम्ही अध्यादेश का काढत नाही ? असेही सवाल ओवैसी यांनी विचारले आहेत.
Why don't they bring it (ordinance on Ram temple)? Let them do it. Every time they are threatening that they will bring an ordinance. Every Tom, Dick & Harry of BJP, RSS, VHP says this. Do it. You are in power. I challenge you to do it. Let us see: Asaduddin Owaisi, AIMIM pic.twitter.com/XXXG4xQLtE
— ANI (@ANI) October 29, 2018
अयोध्या राम मंदिर प्रकरणाबाबत याआधीही असदुद्दीन ओवैसी यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. ‘भाजपने अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावे. मात्र भाजपला देशात धार्मिक विविधता, उदारमतवाद नको आहे. त्यांना देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्यांचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असे देखील ओवैसी म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.