HW Marathi
राजकारण

रातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन

पणजी | गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या २ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांना आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी पत्राद्वारे आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकूण तीन आमदार असून यातील आम्ही दोन तृतीयांश सदस्य आहोत असे म्हणत महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या २ आमदारांनी मंगळवारी (२६ मार्च) रात्री १.४५ च्या सुमारास लोबो यांच्याकडे आपले हे पत्र सादर केले आहे.

मनोहर आजगावकर, दीपक पावस्कर आणि सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तीन आमदार आहेत. दरम्यान, सुदीन ढवळीकर हे गोव्याचे विद्यमान २ उपमुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. तर लोबो यांच्याकडे पाठविलेल्या या पत्रावर अद्याप सुदीन ढवळीकर यांनी स्वाक्षरी केलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यातील भाजप सरकार आता स्थिरावले आहे.

Related posts

महिला आहे म्हणून नव्हे तर सत्तेत आहे म्हणून ट्रोलिंग !

News Desk

भाजपविरोधात रिपब्लिकन फ्रंटची स्थापना

Gauri Tilekar

पियुष गोयल यांना स्वतःचा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

News Desk