पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोनापावला येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले असून मोदींकडून मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. यानंतर मोदी दिल्लीला रवाना होणार माहिती मिळाली असून भाजपध्यक्ष अमित शहा हे पर्रीकर यांच्या अंत्यविधीसाठी थांबणार आहेत. मोदींसह देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी श्रद्धांजली वाहिली
Panaji: Prime Minister Narendra Modi and Defence Minister Nirmala Sitharaman pay last respects to Goa CM #ManoharParrikar pic.twitter.com/aNUC7nEJPm
— ANI (@ANI) March 18, 2019
पर्रीकर यांच्या पार्थिवावर आज (१८ मार्च) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मिरामार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पर्रीकर यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि पर्रीकर यांच्या मित्र परिवारांची कला अकादमीत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
Prime Minister Narendra Modi, Defence Minister Nirmala Sitharaman and Governor Mridula Sinha meet family of Goa CM #ManoharParrikar, in Panaji. pic.twitter.com/X11DkUJofU
— ANI (@ANI) March 18, 2019
भाजप कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, आमदार दयानंद सोपटे, राजेंद्र आर्लेकर, आमदार निलेश काब्राल, प्रविण झांट्ये, सभापती प्रमोद सावंत, हेमंत गोलटकर, दामू नाईक, सिध्देश नाईक, सिध्दार्थ कुंकळ्येकर, सतीश धोंड, श्रीनिवास धेंपो व अन्य नेते व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकरांचे शेवटचे दर्शन घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.