HW News Marathi
राजकारण

मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही !

मुंबई | भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या आणि ईव्हीएम हॅकिंगबाबत हॅकर सय्यद शुजा याने केलेल्या गौप्यस्फोटाने भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाचे प्रडसाद संपूर्ण देशात पडत असाताना दुसऱ्या बाजुला मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या कुंटुंबियांनी मौन बाळगले होते. परंतु आज (२३ जानेवारी) मुंडेंच्या ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले. त्या म्हणाल्या की, “मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही.”

पंकजा मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटल्या की, ”मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान ही मागणी पूर्ण झाली आहे, तसेच त्यातून माझे समाधानही झाले आहे. आता याबाबत अधिक चौकशी करायची असेल तर देशातील मोठे नेते निर्णय घेतील.”

२०१४ साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंग झाले होते. तसेच या ईव्हीएम हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केला होता. या खळबळजनक दाव्यामुळे देशातले राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत या प्रकरणी मौन पाळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk

पियुष गोयल यांना स्वतःचा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

News Desk

ते राजा मी सरदार

swarit