HW News Marathi
राजकारण

संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

मुंबई | संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारपासून (१६ जून) सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर आज (१५ जून) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी विरोधपक्ष नेत्यांशी सोमवारपासून सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा केली. पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधी पक्षांचा कोणत्या चर्चा व विषयांचा आग्रह आहे, त्यासंदर्भात ही बैठक विनोद तावडे यांनी सांगितले.

“लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधा-यांसोबत विरोधकांचेही तितकेचे महत्त्व आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात जनतेचे अधिकाधिक प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने विधीमंडळाचे कामकाज सुरळीत चालविले गेले पाहिजे”, असे आवाहन यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांना करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये जनतेच्या दृष्टीने चांगल्या विषयांना न्याय देण्याच्या दृष्टीने व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चेने सोडविण्याबाबत विरोधकांनी सहमती दर्शविल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

विरोधी पक्षांना सोबत घेऊनच विधीमंडळाचे कामकाज यशस्वी होत असते. त्यादृष्टीने आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले असून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज नक्कीच व्यवस्थितपणे पार पडेल असा विश्वास विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk

भाजप हा मोदीकेंद्री किंवा शहाकेंद्री पक्ष नाही !

News Desk

केंद्रात जर पुन्हा मोदींचे सरकार आले तर त्याला कारणीभूत राहुल गांधीच !

News Desk