संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा ११ डिसेंबर सुरु होणार असून ते ८ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशना दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची गणना देखील सुरू होणार आहे.
नवी दिल्ली | संसदीय कामकाज पहाणा-या कॅबिनेट समितीने (सीसीपीए) मंगळवारी रात्री संसदेच्या हिवाळ्या अधिवेशनासंदर्भात माहिती दिली आहे. अधिवेशना संदर्भात अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील असलेल्या या सरकारचे हे शेवटचे संपूर्ण संसदीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीचे परिणामाची या अधिवेशनाच्या कार्यवाहीवरुन पहायला मिळतील. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी येणार आहेत.
Cabinet Committee on Parliamentary Affairs (CCPA) has decided that next Winter Session will be held from 11th December, 2018 to 8th January, 2019: Union Minister Vijay Goel pic.twitter.com/PCjkn4LDhT
— ANI (@ANI) November 14, 2018
संसदीय कामकाजमंत्री विजय गोयल यांनी ११ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत होणा-या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २० दिवस सुरु रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “आम्हाला सर्व पक्षांचे सहाय्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे. कारण, त्यामुळे अधिवेशनादरम्यान संसदेचे कामकाज उत्तम रीत्या पार पडेल.
राज्यसभेत प्रलंबित असलेल्या तीन तलाक कायद्याचे विधेयक पारीत करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. एकाच वेळी तीन बोलण्याला गुन्हा घोषित करण्यासाठी अध्यादेश जाहीर करण्यात आला होता.
संसदेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु होते. परंतु अधिवेशन डिसेंबर महिन्यात सुरू होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा हिवाळी अधिवेशनाला विलंब झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.