HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

अहमदाबाद | लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेते मंडळी नवीन पक्षा प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे. यात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आज (१२ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रवेशाची माहिती खुद्द हार्दिक यांनी त्यांच्या ट्वीटवरून दिली आहे.  “समाज आणि देशाच्या सेवा करण्यासाठी मी काँग्रेस पक्षमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेताल आहे,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून हार्दिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. २०१५ मध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी हार्दिक यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केले होते. यानंतर हार्दिक प्रकाशाच्या झोतात आले होते. त्यांची ही लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा मानस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे.

त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती. जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.

Related posts

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे ?

News Desk

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, ‘इंदूर’चा निर्णय पक्ष घेईल !

News Desk

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

News Desk