HW News Marathi
राजकारण

पुणे पोलिसांवर शरद पवारांची जोरदार टीका

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर त्यांना कर्ज देणा-या बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. मराठेंना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. यावर आज शरद पवारांनी राज्यसरकार जोरदार टीका केली. तसेच पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर होत असून रविंद्र मराठेंना अटक करणे हा पोलिासांचा आततायीपणा असल्याचेही शरद पवार म्हणालेत.

डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आर एन सरदेसाई न्यायालयात गैरहजर राहिल्याने मराठे यांच्या जामिनावरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?

News Desk

आंबेडकर, शिंदेसह शिवाचार्य उमेदवारांची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का ?

News Desk

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Aprna
मुंबई

अशी असेल माल्ल्याची आर्थर रोड कारागृहात व्यवस्था

News Desk

मुंबई | भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये मोठी तयारी सुरु आहे. आर्थर रोड कारागृहामधील बराक क्रमांक १२ चे रूप संपूर्णपणे पालटण्याचे काम सध्या सुरु आहे. बराकमधील रंगकाम, टाइल्स तसेच बाथरूमची दुरुस्ती आणि नूतनीकरणाला गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे.

माल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून कारागृहाच्या २ कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमेश कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडे कारागृहाच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थर रोड कारागृहातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याआधी कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल देखील इंग्लंडला पाठविण्यात आला आहे.

परंतु, कारागृहामध्ये डागडुजीची आवश्यकता असल्याने हे काम करण्यात येत आहे, असे स्पेशल आयजी दक्षिण मुंबई राज्यवर्धन सिन्हा यांचे म्हणणे आहे. तसेच कारागृहातील सर्वच कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि रंगकामाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थर रोड जेलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय नसल्याचे माल्ल्याने लंडन कोर्टात सांगितले होते. त्यानुसार सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबासाठी कोठडीमध्ये एका भिंतीवर काळा रंग लावण्यात आला आहे.

Related posts

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

News Desk

स्थायी समितीच्या सदस्य पदावरुन सेनेच्या २ नगरसेवकांचे राजीनामे

swarit

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk