HW News Marathi
राजकारण

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी (३१ मे) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी न्यायालयात क्राईम ब्रँचकडून या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाकडून डॉ. पायल आत्महत्या प्रकरणातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली.

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, या सुनावणीदरम्यान या तिन्ही महिला आरोपी शिकवल्यासारख्या बोलत असल्याचे निदर्शनास आले. तसेच क्राईम ब्रँचकडून न्यायालयात या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. “ही घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट सापडलेली नाही. तिन्ही आरोपी शिकवल्यासारखे, एकसारखेच बोलत आहेत. त्याचप्रमाणे आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे देखील क्राईम ब्रँचकडून न्यायालयात सांगण्यात आले. मात्र, न्यायायाकडून या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीसाठीही शेतकऱ्याला ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ नावाखाली रडवले गेले !

News Desk

उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेआधीच कमलनाथ यांचे अभिनंदन

News Desk