शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने शिर्डीत साई चरणी लीन झाले असून मोदींनी साईच्या पादुकांचे पूजन केले. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साईबाब मंदिरात असलेल्या पुस्तकात त्यांनी अभिप्राय लिहिला आहे. ‘श्री साईबाबांच्या दर्शनानं मनाला शांतता मिळाली. श्रीसाईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भुत स्वरुप पाहायला मिळतं. सर्व पंथांचे लोक श्रीसाईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता, श्रीसाईबाबांचा सबका मालिक एक है हा संदेश जगाच्या शांततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्व साईभक्तांना साईबाबांचा आशीर्वाद मिळू दे. त्यांना सुख आणि शांतता मिळू दे, अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा साईंच्या चरणी नतमस्तक होतो,’ असा अभिप्राय मोदींनी पुस्तिकेत नोंदवला.
साईची मनोभावे आरती करून साईच्या समाधीवर चादर चढवली आहे. यावेळी मोदींसोबत राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शताब्दी उत्सवा निमित्ताने मोदी ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात आली आहे. या सभेत मोदींनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.
Prime Minister Narendra Modi hands over keys to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Rural) in Shirdi. #Maharashtra CM Devendra Fadnavis also present. pic.twitter.com/oFNOdRagWX
— ANI (@ANI) October 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.