शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार) शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. श्री साई बाबा मंदिराच्या समाधी शताब्दी उत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी झाले आहेत. शताब्दी उत्सवा निमित्ताने मोदी ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोदी शिर्डीतील जनतेशी संवाद साधण्यास सुरूवात केली. या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Prime Minister Narendra Modi hands over keys to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Rural) in Shirdi. #Maharashtra CM Devendra Fadnavis also present. pic.twitter.com/oFNOdRagWX
— ANI (@ANI) October 19, 2018
Maharashtra: Prime Minister Narendra Modi offers prayers at Shri Saibaba Samadhi Temple Complex in Shirdi. pic.twitter.com/WquG1JGQfS
— ANI (@ANI) October 19, 2018
मोदींच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मोदींचे स्वागत केले आहे. मोदींनी साईबाबाच्या चरणी लीन झाले आहे. साई संस्थांनाकडून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना साईबाबाची प्रतिमा भेट दिले आहे. तसेच मोदींच्या हस्ते साई मंदिरात चांदच्या नाण्यांचे अनावरण करण्यात आले.
Maharashtra: Prime Minister Narendra Modi arrives in Shirdi. He will participate in the Sai Baba Samadhi centenary celebrations today. pic.twitter.com/MrJjpbdbXB
— ANI (@ANI) October 19, 2018
तृप्ती देसाईं पोलिसांच्या ताब्यात
भूमाता ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई या केरळच्या शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शिर्डीच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु पुणे पोलिसांनी त्यांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेतले. सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.