HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

लातूर | आगामी निवडणुकांसाठीच्या भाजप-शिवसेना युतीच्या वर्धा येथे झालेल्या पहिल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबावर, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. पंतप्रधान मोदींची आज (९ एप्रिल) लातूरमधील औसा येथे आणखी एक प्रचार सभा झाली. या सभेत मात्र शरद पवार यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचा सूर वेगळा लागला आहे. “काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना केला आहे. दरम्यान, पहिल्या सभेत शरद पवारांवर सडकून टीका करणारे पंतप्रधान मोदी आता मात्र त्यांच्याबाबत काहीशी सौम्य भूमिका का घेत आहेत ?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

राजकारण आपल्या जागी आहेच. परंतु, भारतापासून काश्मीर वेगळं करू पाहणाऱ्यांसोबत, देशात दोन पंतप्रधान हवे असणाऱ्यांसोबत आपण असणं शरदराव आपल्याला शोभून दिसत नाही. यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर तोंडसुख घेतल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. शरद पवार हे अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांपेक्षा वेगळे आहेत, असे दाखविण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न त्यांच्या या भाषणातून स्पष्टपणे दिसला. यामागची नेमकी कारणे काय असावीत याबाबत आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Related posts

दिल्लीची आजचीच घडी कायम राहील, ‘ती’ विस्कटावी असे वातावरण देशात नाही !

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

News Desk

पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना इतके का घाबरतात ?

News Desk