HW News Marathi
राजकारण

लोकांनी विरोधात बसण्याची संधी दिली, सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडू !

सातारा | “लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या पूर्ण करू. विरोधकांना सन्मानजनक जागा दिल्या. आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल लोकांचे आभार मानतो”, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. “लोकांनी विरोधात बसण्याची संधी दिली आहे. सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडू”, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपला जोरदार धक्का देत राष्ट्रवादीने बाजी मारली. याच विधानसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी आपल्याला पाठिंबा दिलेल्या, आपल्यावर विश्वास ठेवलेल्या जनतेचे आभार मानले.

“ज्या बारामतीने मला मोठं केलं, नाव दिलं, सुप्रियाला प्रेम दिलं, अजितला राज्यात मोठं केलं. त्या बारामतीने अजितला राज्यात क्रमांक एकची मत दिली, याचा मला मनस्वी आनंद आहे. हे बारामतीकरांचे प्रेम आहे. या विक्रमी मतांनी माझ्या, सुप्रियाच्या, अजितच्या आणि रोहितच्या खांद्यावर आता जबाबदारीचे ओझे वाढले आहे. आम्ही ही जबाबदारी नक्कीच पार पाडू”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की”एखाद्या तत्वासाठी पक्षांतर केले तर लोक स्वीकारतात. मात्र, यावेळी जे पक्षांतर झाले ते सत्तेसाठी झाले. त्यामुळे अशा प्रकारचे पक्षांतर लोक स्वीकारत नाहीत.”

विधानसभेत विजयी झाल्यानंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. तर राम शिदेंनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत त्यांना फेटा बांधला. याच पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले कि, “आपण सभ्य लोक आहोत. राजकारणात सुसंस्कृतपणा हवा. निवडणूक पार पडल्यावर राजकारण सोडून द्याव. राम शिंदे जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या वडीलकीचा मान ठेवून रोहित त्यांना भेटला. हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण आहे”, असे शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

News Desk

२०१९ अखेर पुण्यात मेट्रो धावणार !

News Desk

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

News Desk