HW News Marathi
राजकारण

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

मुंबई | संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाअपेक्षित सामाजिक समतेची क्रांती घडविण्याचा मार्ग शैक्षणिक क्रांतीतूनच होईल. त्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली नाही तर समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर असल्याचा आम्हाला अभिमान असून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याने ही संस्था सामाजात झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा ऐतिहासिक पाया ठरली आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्धभवन येथील सभागृहात आयोजित कर्यक्रमात रामदास आठवले अध्यक्ष म्हणून बोलत होते. रामदास आठवले हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले त्यात समाजसेवक, पत्रकार, डॉक्टर , क्रिकेटपटूही घडले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात रामदास आठवले हे सुद्धा विद्यार्थी होते. आज ते केंद्रियराज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी रिपाइं पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पी ए सोसायटीचे अशोक तळवटकर, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. व्ही.राव, डॉ. जयमंगल धनराज, गौतम सोनवणे, बी के बर्वे, एड आशाताई लांडगे, चंद्रशेखर कांबळे, घनश्याम चिरणकर, सो ना कांबळे, प्रकाश कमलाकर जाधव , सचिन बनसोडे, सचिनभाई मोहिते, शिरीष चिखलकर, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ, आता तरी आत्मचिंतन करा !

News Desk

व्यंगचित्रातून राष्ट्रवादीची मोदींवर टीका, सगळ्यांना हातातले ‘टेडी बिअर’ बनवले !

News Desk

चले जाओ मोदी

News Desk