HW News Marathi
राजकारण

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

नवी दिल्ली | “आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये. केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या निधीचा वापर जनतेच्या भल्यासाठी करावा. निवडणुका येतील आणि जातील”, असे म्हणत पंतप्रधान मोदी ओडिसा सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आज ओडिसा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकास योजनांचे उदघाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी आणि सप-बसपच्या आघाडीवर मोदींनी निशाणा साधला आहे. “सध्या देशात माझ्याविरोधात कारस्थान रचले जात आहे. खोटे आरोप केले जात आहेत. मला त्यांच्या मार्गातून हटविण्यासाठी ते एकत्र येत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हा चौकीदार गरिबांना लुटणाऱ्या प्रत्येकाला हा चौकीदार शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा मोदींनी दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

युट्युब चॅनेल विरोधात विखे पाटलांची पोलिसात तक्रार

News Desk

“दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, संजय राऊतांची राज्य सरकारवर बोचरी टीका

Aprna
राजकारण

कर्नाटकात कुमारस्वामींना मोठा धक्का, २ अपक्ष आमदारांनी काढला काँग्रेसचा पाठिंबा

News Desk

नवी दिल्ली | कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (१५ जानेवारी) २ अपक्ष आमदारांनी राज्यातील काँग्रेस-जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

“दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर काय संख्यबळ राहते? यामुळे आम्हाला फार फरक पडत नाही, मी निश्चिंत असून मला माझी ताकद माहिती आहे. सध्या प्रसार माध्यमांमध्ये जे सुरू असलेल्या चर्चेचा मी आनंद घेत असल्याचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे”.

भाजप सरकारने कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने १०४ आमदरांना हरियाणाच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राज्यातील सरकार पाच वर्षेचा कालावधी पूर्ण करेल, असा दावा कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.

“आज संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहत साजरा होत असताना, कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू न शक्यल्यामुळे मी पाठिंबा काढून घेतला”, असल्याचे अपक्ष आमदार आर. शंकर यांनी सांगितले आहे.

“कर्नाटकात चांगली आणि स्थिर सरकार येण्यासाठी मी काँग्रेस-जेडीएसच्या आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. कर्नाटक राज्यात भाजप स्थिर सरकार निर्माण करून शकते. त्यामुळे मी माझा पाठिंबा भाजपला देत असल्याचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी म्हणाले आहे.”

महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी तीन दिवसानंतर कर्नाटकात भाजपची सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजपचे ऑपरेशन लोट्स नक्कीच यशस्वी होणार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. कर्नाटकात भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे आमचीच सरकार स्थापन होणार असल्याचे ते म्हणाले.

 

Related posts

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

News Desk

सरकारने अण्णांच्या जीवाशी खेळू नये | उद्धव ठाकरे

News Desk

मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारूचे वाटप

News Desk