गोवा | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (१७ मार्च) निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त देत शोक व्यक्त केला. आता भाजपच्या मुख्यालयात मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी दुपारी १.३० वाजेपर्यंत गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील अंत्ययात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी २.३० पर्यंत गोव्यात दाखल होतील, अशीही माहिती मिळत आहे.
Prime Minister Narendra Modi to leave for #Goa shortly, to offer last respects to Goa CM #ManoharParrikar who passed away yesterday. pic.twitter.com/adrMxbKmJV
— ANI (@ANI) March 18, 2019
Goa: Visuals from BJP office in Panaji. Mortal remains of Goa CM #ManoharParrikar will be brought here for people to pay last respects to him. pic.twitter.com/zSHGEZqwBu
— ANI (@ANI) March 18, 2019
Goa: Mortal remains of Goa CM #ManoharParrikar being taken to BJP office from his residence, in Panaji. pic.twitter.com/Ksr8afYDNa
— ANI (@ANI) March 18, 2019
भाजप मुख्यालयानंतर मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव कला अकादमीमध्ये आणण्यात येईल. भाजप प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य नागरिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कला अकादमीमध्ये पर्रीकर यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजी येथे अंत्यसंस्कार केले जातील. गेले अनेक महिने पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्राने आज म्हणजेच १८ मार्चला राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशातील अन्य राज्यांच्या राजधानीत तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.