नवी दिल्ली | नमो अॅपवर (नरेंद्र मोदी मोबाईल अॅप) सध्या एक ‘पीपल्स पल्स’ नावाचे सर्वेक्षण केले जात आहे. नमो अॅपच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तीन लोकप्रिय नेत्यांची नावे सांगण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी लोकांनी दिलेल्या मतांचा वापर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या भाजपमधील अनेक खासदार चिंतेत आहे.
I want your direct feedback on various issues…take part in the survey on the ‘Narendra Modi Mobile App.' pic.twitter.com/hdshOPnOEY
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2019
नमो अॅपवरील ‘पीपल्स पल्स’ या सर्वेक्षणात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून केले आहे. ‘मला या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तुमच्या थेट प्रतिक्रिया, मत समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही व्यक्त केलेल्या मतांमुळे आम्हाला निर्णय घेणे अधिक सोपे होईल’ असे पंतप्रधान मोदींनी या व्हिडीओमध्य म्हटले आहे. पंतप्रधान मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देखील लोकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
It is a great opportunity to share your feedback with Prime Minister Shri @narendramodi on various issues relating to our constituencies and governance.
You can do that by taking the survey on the ‘Narendra Modi Mobile App' and do our bit towards a #NewIndia.
— Amit Shah (@AmitShah) January 14, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.