HW News Marathi
राजकारण

सोशल मीडियावर जाहीरातींवर राजकीय पक्षांनी खर्च केले तब्बल ५३ कोटी रुपये

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून ते आतापर्यंत भारतातील राजकीय पक्षांनी फेसबुक आणि गुगल आदी डिजिटल माध्यमांत प्रचारासाठी ५३ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. यात देशात सत्ताधारी भाजपने सर्वाधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने निवडणुकीच्या काळात फेसबुकवरील २,५०० पेक्षा अधिक जाहिरातींवर ४.२३ कोटी रुपये खर्च केले आहे. माय फर्स्ट व्होट फॉर मोदी, भारत के मन की बात, नेशन विथ नमो यासारख्या पेजनेही सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरील जाहिरातींवर चार कोटी रुपये खर्च केले. गुगलच्या व्यासपीठावर भाजपने १७ कोटी रुपये खर्च केले.

दुसरीकडे काँग्रेसने काँग्रेसने फेसबुकवरील ३,६८६ जाहिरातींवर १.४६ कोटी रुपये खर्च केले. तसेच गुगलवरील ४२५ जाहिरातींवर २.७१ कोटी रुपये खर्च केले. भाजप, काँग्रेस पाठोपाठ तृणमूल काँग्रेसने देखील फेसबुकच्या जाहीरातीसाठी २९.२८ लाख रुपये खर्च केले. तसेच आम आदमी पार्टीने फेसबुकवर १७६ जाहिराती चालवल्या व त्यासाठी १३.६२ लाख रुपये मोजले. त्याचप्रमाणे गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बन डिजिटल सॉल्युशन्स आपसाठी जाहिराती करत असून, त्याने १९ मेनंतर २.१८ कोटी रुपयांचे बिल दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी दिले ‘हे’ तीन नवे पर्याय

Aprna

‘सुराज्य यात्रा काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही ?’

Gauri Tilekar

सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे !

News Desk