HW News Marathi
राजकारण

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

सातारा | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातले राजकीय वितुष्ट जगजाहीर आहे. त्यातच हे दोघे एकाच व्यासपीठावर आले तर लोकांना आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु चक्क एकाच व्यासपीठावर या दोघांना पाहून अनेकजण आवाक झाले. निमित्त होते सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभाचे. या बक्षिस समारंभाला उदयनरोजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही उपस्थित राहिले होते.

अनेक दिवसांपासून या दोन्ही राजांमध्ये राजकारणावरुन जोरदार टीका सुरू आहे, परंतु या कार्यक्रमात मात्र पहिल्यांदा शिवेंद्रराजे भोसले आले त्यानंतर पाच मिनीटांनी उदयनराजे भोसले आले, एकाच व्यासपिठावर हे दोघे आल्यामुळे उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, दोघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे कदाचित एकमेकांशी संवाद साधतील असे वाटणा-या अनेकांचा यावेळी अपेक्षा भंग झाला असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमात दोघेही शेजारी बसले होते मात्र एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.

Related posts

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

Gauri Tilekar

RamMandir : अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त

News Desk
देश / विदेश

इस्रोच्या कार्यालयाला आग

News Desk

अहमदाबाद | अहमदाबाद येथील इस्रोच्या कार्यालयाला आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एका तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इस्रोच्या कार्यालयाला लागलेल्या या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related posts

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील,शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पराभव, तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

Aprna

शरद पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज, फौजिया खान मात्र प्रतिक्षेत

swarit