मुंबई | १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. यवतमाळमध्यो मतदानाला सुरुवात होताच काही मतदार केंद्रावरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदारांना अर्धा तास रांगेत ताटकळत रहावे लागले. यवतमाळमध्ये मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
Maharashtra: Mock polling for #LokSabhaElections2019 underway at booth number 255 in Nagpur. pic.twitter.com/sY4v6Opm7s
— ANI (@ANI) April 11, 2019
यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून भावना गवळी तर कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, प्रहारकडून वैशाली येडे, बहूजन समाज पक्षाकडून अरुण किंनवटकर, वंचित बहूजन आघाडीचे प्रविण पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष व अपक्ष मिळून एकूण २४ उमेदवार या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.
Maharashtra: Voting underway at a polling booth in Allapalli village, in Gadchiroli #LokSabhaElections2019 pic.twitter.com/6kImZ8kwPl
— ANI (@ANI) April 11, 2019
२०१४ सालच्या यवतमाळ-वाशीमच्या लोकसभा निवडणूक निकालांवर
२०१४ मध्ये यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे त्याचबरोबर बसपाचे बळिराम राठोड हे उभे होते. त्यावेळी शिवसेनेच्या भावना गवळी यांना ४,७७,९०५ मतं मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३,८४,०८९ मतं मिळाली होती. जवळपास ९३,८१६ एवढ्या मतांच्या फरकाने भावना गवळी विजयी झाल्या होत्या. तर बसपच्या बळिराम राठोड यांना ४८,९८१ मतं मिळाली होती. या मतांची टक्केवारी पहिली तर शिवसेनेला २७% कॉंग्रेसला २१% आणि बसपच्या पारड्यात केवळ २% मतं पडली होती
यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील मतदारांची संख्या
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या जवळपास १७,५५,२९२ एवढी आहे. त्यापैकी एकूण पुरुष मतदारांची संख्या ९,२१,२७६ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ८,३४,०१० इतकी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.