HW News Marathi
राजकारण

भिमा काेरेगाव येथे सीआरपीएफच्या बंदाेबस्तात पार पडणार मतदान

पुणे | महाराष्ट्रात चाैथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल राेजी पार पडत आहे. राज्यातील अनेक दिग्गज आणि नव्या चेहऱ्यांच्या चर्चा रंगल्या आहेत. या टप्प्याच्या निवडणुकीत भिमा कोरेगाव हे शिरुर मतदार संघामध्ये येते. या मतदार संघातील भिमा कोरेगाव हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये. यांची खबरदारी म्हणून प्रशासनाकडून केंद्रावर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. १ जानेवारी २०१७ राेजी भिमा काेरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास आलेल्या बौद्ध अनुयायांवर हल्ला करण्यात आला हाेता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसात राज्यात उमटले हाेते. या मतदारसंघात त्यांचे वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

राजकारणातही नौटंकी होत असते !

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार?

Aprna