HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही !

मुंबई | शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडली आहे. यांचे कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबई भाजपची उमेदवार पूनम महाजन यांच्यामध्ये पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. पूनम महाजन यांच्या बॅनरवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज असून जो पर्यंत त्या त्यांची चूक मान्य करणार नाही. तो पर्यंत युवासेना पूनम महाजन यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार तर नाहीच आणि प्रचार देखील करणार नसल्याची आक्रमक पवित्रा युवासेनेकडून घेण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा शिवसेनेचा अपमान असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना डावलले जात आहे. या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत.

युवासैनिक पूनम महाजन यांच्या कुठलीही सभा आणि प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका युवासेनेकडून घेण्यात आली आहे. तसेच पूनम महाजन यांचा निषेध करण्यासाठी आज (३० मार्च) संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक वांद्र्यातील शाखेत एकवटणार आहे. निवडणुकीची पुढील रणनिती ठरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Related posts

EXIT POLL : छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, काँग्रेस मात्र बहुमतापासून दूर

News Desk

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk

पंकजा मुंडेंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे |उद्धव ठाकरे

News Desk