HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी ‘या’ नावांची चर्चा

मुंबई | राज्यातील सत्तांतरापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक धक्के देताना पाहायला मिळत आहेत. अशात आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. आता शिंदे गट आणि भाजपकडून नवी यादी राज्यपालांना दिली जाणार आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत नवं सरकार स्थापन केलं. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. अशात आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. शिंदेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं असून ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याचं समजतंय. खरंतर गेली दीड वर्ष ही नियुक्ती रखडली होती. पण सत्तापालट होताच शिंदे ही जुनी यादी रद्द करुन नवी नावे सादर करतील, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. अखेर हे खरं ठरताना दिसून येतंय.

‘मविआ’ने दिलेल्या यादीत कुणाची नावे होती?

त्याचं झालं असं की ठाकरे सरकार अस्तित्वात असताना 12 नोव्हेंबर 2020 मध्ये 12 नावांची यादी राज्यपालांकडे देण्यात आली होती. यामध्ये महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामधील प्रत्येकी चार-चार अशी 12 जणांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे आणि काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर अशी 12 नावं देण्यात आली होती. पण राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यादरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमधले वादही महाराष्ट्राने पाहिले आहेत. पण सरकार बदलल्यानंतर आता ही 12 नावांची यादीच मागे घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यपालांना पत्र दिलं आहे.

नव्या यादीत ‘ही’ नावं चर्चेत 

दरम्यान, राज्यातल्या सत्तांतरानंतर नवं सरकार म्हंटल्यावर नवी समीकरणं पाहायला मिळत आहेत. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या 12 नावांची यादी आता मागे घेतली जातेय. नवं सरकार ही यादी मागे घेत नवीन यादी लवकरच राज्यपालांकडे पाठवणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिंदे-फडणवीसांकडे या 12 नावांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण यामध्ये चर्चेत असणारी संभाव्य काही नावं जाणून घेऊयात.

शिंदे गटातील संभाव्य नावे 

रामदास कदम, चंद्रकांत रघुवंशी, विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ, अर्जुन खोतकर किंवा नरेश मस्के.

भाजपमधील संभाव्य नावे 

चित्रा वाघ, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंग, गणेश हाके आणि सुधाकर भालेराव ही सहा नावं चर्चेत आहेत. मात्र त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. या यादीसंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेचही पाहायला मिळू शकते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय अधिका-यांची कारकिर्द व भवितव्य धोक्यात

swarit

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

Aprna

विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk