हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एआयएमआयमचे प्रमुख असुद्दुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. निकालापूर्वीच एमआयएमने टीआरएससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काँग्रेसला याबाबत इशाराही निवडणुकांपूर्वीही एमआयएमने टीआरएससोबत हातमिळवणी करुन संगणमताने विधानसभा निवडणूक लढविली आहे.
AIMIM Chief Asaduddin Owaisi will meet caretaker Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao at 1.30 pm today. (file pics) pic.twitter.com/wMGKFJgLLl
— ANI (@ANI) December 10, 2018
तेलंगणात चंद्रशेखर रावच्या टीआरएस पक्षाचेच कार्यकर्ते विजयाचा गुलाल उधळतील, असे चित्र एक्झिट पोलनंतर दिसत आहे. त्यामुळे टीआरएस कार्यकर्ते विजयी जल्लोषाच्या तयारीला लागले आहे. तर नेते टीआरएस सत्तास्थापनेच्या मागे लागले आहेत. परंतु काँग्रेसने एमआयएमला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
#WATCH Hyderabad: AIMIM Chief Asaduddin Owaisi arrives at the CM residence to meet caretaker Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao. pic.twitter.com/HSnOyX4NAs
— ANI (@ANI) December 10, 2018
तेलंगणात टीआरएसला मदत करण्यासाठी भाजप पुढे येत असेल, तर काँग्रेसला साथ देण्यासाठी एमआयएम हात देईल, असे काँग्रेस नेते जी.एन. रेड्डी यांनी म्हटले आहे. परंतु, ओवैसी यांनी निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. तसेच केसीआर यांना बाहेरुन पाठींबा देणार असल्याचेही, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारमध्ये एमआयएम पक्षाला संधी मिळणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, असुद्दुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असून टीआरएसला समर्थन देण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.