HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत, धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ मे) अयोध्येत असणार आहेत. दरम्यान, अयोध्येत जाऊन देखील पंतप्रधान मोदी हनुमानगढी मंदिर, राम मंदिरात जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी या धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याचे नेमके कारण काय ? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या राम मंदिर प्रकरणाची सुनावणी सुरू असून निर्णय आल्यानंतर पंतप्रधान मोदी अयोध्या राम मंदिराला भेट देतील, असे देखील म्हटले जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी हे अयोध्येत असताना हनुमानगढी मंदिरात दर्शन घेऊन गेले होते. मग पंतप्रधान मोदी दर्शन घेणे का टाळत आहेत ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फैजाबाद आणि आंबेडकरनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज रामपूरमध्ये जाहीर सभा आहे. यावेळी ते अयोध्येतील जनतेला संबोधित करणार आहेत. रामपूर हे वादग्रस्त राम जन्मभूमीपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी देओल यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

Seema Adhe

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार-अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

News Desk