HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे”, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयीचे विधान हे अत्यंत असंवेदनशील असल्याचे म्हणत मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी देखील बघेल यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी हे दिवसातून केवळ ३ ते ४ तासच झोपतात. त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे बघेल यांनी म्हटले आहे. “पंतप्रधान मोदी यांचे केवळ सत्ता आणि खुर्ची या दोनच गोष्टींवर प्रेम आहे. सत्तेसाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात”, असेही बघेल यावेळी म्हणाले.

“पंतप्रधान मोदी हे दिवसातून केवळ ३ ते ४ तासच झोपतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. ज्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे त्या व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानपदी असणे अत्यंत धोकादायक आहे”, असेही बघेल यांनी म्हटले आहे. “राजीव गांधी यांनी राष्ट्राच्या निर्माणासाठी मोलाची कामगिरी केली. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या एका व्यक्तीने भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे हे शोभनीय नाही. यावरूनच लक्षात येईल कि पंतप्रधान मोदी यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे”, असे बघेल म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

News Desk

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

News Desk