HW News Marathi
राजकारण

शरद पवार तुमच्यासारखा नेता पाकिस्तानचे कौतुक करतो ?

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच टप्प्यातील राज्यस्तरीय महाजनादेश यात्रेचा समारोप आज (१९ सप्टेंबर) नाशिकच्या तपोभूमीतून होणार आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये आले. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानचे केलेल्या कौतुकावर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी म्हणाले, शरद पवार तुमच्या सारखा नेता पाकिस्तानचे कौतुक करतो?, यावर सवाल उपस्थित केले. शरद पवार तुम्ही काहीही बोला मात्र साऱ्या जगाला माहीत आहे, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे, काँग्रेसची मजबूरी मी समजू शकतो, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर देखील टीका केली.

फडणवीस यांचे कौतुक करत शेतकऱ्यांना मदत मिळाली, महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली, पाण्याचा संघर्ष कमी झाला, असल्याचा दावा मोदींनी केला. महाराष्ट्र पुन्हा लोडशेडींगमध्ये जाऊ नये म्हणून हेच सरकार पुढे निवडून देणे गरजेचे आहे.महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पार्दर्शक कारभार असलेले सरकार विश्वास व्यक्त केला. यामुळे महाराष्ट्रातील जनतेने एक स्थितीर सरकार स्थापन होण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आव्हान मोदींनी यावेळी केले. ४० वर्ष कश्मीरी लोक दिल्ली सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे यातना भोगत होते, मात्र आता त्यांचे स्वप्न पूर्ण होतील, असे म्हणत मोदींनी काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा काँग्रसवर आरोपाच्या फैरी झाडल्या.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • जय भीम, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय घोषणा देत मोदींनी भाषण पूर्ण केले
  • चला पुन्हा एकदा आपले सरकार, असे मोदी म्हणले.
  • आमचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आहे
  • सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा विषय आहे, मग विधाने कशाला करतात
  • नाशिक रामाची भूमी आहे, काही लोकांनी काही दिवसांपासून राम मंदिराविषयी बोलत आहेत
  • महाराष्ट्र पुन्हा लोडशेडींगमध्ये जाऊ नये म्हणून हेच सरकार पुढे निवडून देणे गरजेचे आहे
  • नाशिक संरक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणार आहे, इथे संशोधन केंद्र उभ करण्यात येणार आहे
  • वीर सावरकरांना जन्म देणारी महाराष्ट्राची भूमी आहे, महात्मा फुले, बाबासाहेबांची ही भूमी आहे
  • शरद पवार तुम्ही काहीही बोला मात्र साऱ्या जगाला माहीत आहे, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे!
  • काँग्रेसची मजबूरी मी समजू शकतो, पण शरद पवार तुमच्या सारखा नेता पाकिस्तानचं कौतुक करतो?
  • मात्र विरोधक, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहेत
  • त्यांना विकास हवा आहे, त्यामुळे संपूर्ण देश आता त्यांच्या सोबत आहे
  • ४० वर्ष कश्मीरी लोक दिल्ली सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे यातना भोगत होते, मात्र आता त्यांचे स्वप्न पूर्ण होतील
  • तुम्ही कश्मीरच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे या, असे आव्हान मोदींनी यावेळी केले.
  • कश्मीर हमारे है अशा घोषणा दिल्या होत्या, आता नवा कश्मीर निर्माण करायचा आहे, अशा घोषणा द्या
  • या निर्णयामुळे जम्मू-कश्मीरमधील स्वप्न-आकांशा पूर्ण होतील
  • आम्ही जम्मू-कश्मीरसाठी नवे प्रयत्न करू, आज त्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने देश चालू लागला आहे
  • देशाच्या सुरक्षेला भाजप सरकारचे प्राधान्य असेल
  • पण आमचे एनडीए सरकार आल्यानंतर आम्ही बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी प्रक्रिया गतीमान केली
  • २००९ मध्ये बुलेटप्रुफ जॅकेट नसल्याने आमचे वीर शहीद झाले, पण पुढे पाच वर्ष काँग्रेस-एनसीपी सरकारने जॅकेट घेतले नाही
  • राफेल देखील लवकरच दाखल होणार आहे
  • सैन्याला सशक्त करण्यासाठीचे वचन दिले होते, त्यासाठी दोन आधुनिक हेलिकॉप्टर सैन्यात दाखल झाले
  • पशूधन चांगले राहिले पाहिजे म्हणून लसीकरण सुरू केले आहे, यात आमचा राजकीय हेतू नाही
  • वीज, पाणी पोहचवू त्यासाठी आम्ही पाऊले उचलले
  • आम्ही जे वचन दिले होते, ते पूर्ण केले
  • प्रॉमिस, परफॉर्मन्स, आणि डिलिव्हरी हे या सराकारचे सूत्र आहे
  • विविध समाजांना न्याय मिळाला, ही पाच वर्षांची केवळ उपलब्धी नाही तर फडणवीस सरकारचा रिपोर्ट कार्ड आहे
  • शेतकऱ्यांना मदत मिळाली, महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली, पाण्याचा संघर्ष कमी झाला
  • गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला पारदर्शी कारभार असलेले सरकार, प्रशासन मिळाले
  • ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच जनतेने लोकसभेत आधीचेच सरकार पुन्हा एकदा जास्त जागांवर जिंकून आले
  • जनतेप्रती समर्पणाची भावना ही फडणवीस यांच्या दिसून येते
  • आता महाराष्ट्रातील जनतेने एक स्थितीर सरकार स्थापन होण्यासाठी पुन्हा संधी देणार आहे
  • देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रला नवीन दिशा दिली आहे
  • पुण्याला पवित्र भूमी मानतात, या भूमिला लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक दिग्गज नेताचा आशीर्वाद मिळाल आहे.
  • फक्त मुंबई चकमकणाऱ्या दुनियमुळे महाराष्ट्रतील इतर जिल्हे दुर्लक्षित झाले.
  • महाराष्ट्र राजकीय अरस्थितरतेमुळे राज्या ज्या पद्धतीने आगे जाण्याची गरज होती. ते झाले नाही.
  • महाराष्ट्र जनतेने ठरविले आहे की, जे काम करणा त्यांच आशर्वाद मिळाले असल्याचे जनतेने निश्चिय केला आहे
  • देवेंद्र फडणवीस यांच्या टीमला आशर्वाद देण्यासाठी हा संपूर्ण जनसागर उसळा असून हा एक प्रकार लोकशाहीचा संदेश दिला आहे
  • जनसभेत ऐवढा जनसागर उसळला होता. तेव्हा संपूर्ण देशातील भाजप लहरला दाकत दिली होती.
  • एप्रिलमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका ऐन रंगात होता. तेव्हा मी दिंडोरीमध्ये सभेसाठी आला होता. त्या
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले, हा सन्मान पण आहे.
  • मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्य मंत्री रावसाहबे दानवे पाटील, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या छत्रपती उदयनराजे यांचे स्वागत केले
  • श्री राम आणि सीता मातेच्या चरण पर्शाने पावन, आदी मागया आणि शक्ती स्पश्रृंगी मातेच्या निवासाने पवित्र, अशा नाशिकच्या धर्मभूमीला माझा नमस्कार
  • पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंचावर आगमन झाले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna

महाआघाडीचा निर्णय १० डिसेंबरला ?

News Desk

महाराष्ट्रासह देशभरात ‘या’ दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

News Desk