HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ एप्रिल)  महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची महाराष्ट्र दौऱ्यातील वर्धा येथे पहिली प्रचार सभा होणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी महाराष्ट्रात ८ सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज वर्धामध्ये प्रचारासाठी येणार आहेत. या प्रत्येक टप्प्यातील मतदानासाठी मोदींच्या २ सभा आयोजित करण्याचा आल्या आहेत. मोदींच्या मुंबईतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती.

 

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंहची तब्येत बिघडली, उद्या न्यायालयात हजर राहणार ?

News Desk

आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी !

News Desk

Saradha Scam : सीबीआयकडून पी.चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk