HW Marathi
राजकारण

मी पहिल्यांदा पाहिले की, संसदेत “आँखों से गुस्ताखियाँ होती है !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील आज (१३ फेब्रुवारी) शेवटचे भाषण होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मोदी सरकारच्या काळातील १६ व्या लोकसभेचे हे अखेरचे सत्र असून मोदींचा लोकसभेतील आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. मोदींनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांच्या विकासाचा लेखाजोखा मांडला आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलेच आणि मोदींनी त्यांच्या कार्यकाळातील संसदेतील काही आठवणींना उजाळा देखील दिला.

“मला पहिल्यांदा संसदेत आल्यानंतर खूप काही गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. मला पहिल्यांदा कळाले की, गळाभेट करणे आणि गळ्यात पडणे यातील फरक काय असतो. ते मला येथेच कळाले. तसेच मी पहिल्यांदा संसदेत पाहिले की, “आँखों से गुस्ताखियाँ होती है.”

मी ऐकले होते की, भूकंप येणार परंतु गेल्या पाच वर्षात कोणताच भूकंप आला नाही. कधी आवाज जास्त मोठा होत होता, मात्र लोकशाहीची शक्ती इतकी मोठी आही, की त्या शक्तीने भूकंपाचे हादरे ही पचवले, असे बोलून मोदींनी राहुल गांधीवर टीका केली. ऐका बाजूला जग हे ग्लोबल वार्मिंगवर चर्चा करत आहे. तर भारतने ग्लोबल वार्मिंगवर फक्त चर्चा न करता सोलर अलायन्सची निर्मिती करून या समस्येवर तोडगा काढला  आहे.

मोदी म्हणाले की, ‘आमच्या कार्यकाळात संसदेत २१९ विधेयके आले आणि त्यातली २०३ पारित झाली. आधारला याच सभागृहाने खूप मोठी ताकद दिली. नोटाबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय घेतले.

सामाजिक न्यायाच्या दिशेनेही या सभागृहाने पावले उचलली. आरक्षण कायदा आणला. समाजातल्या मागास वर्गासाठी कायदा आणला. देशाने गेल्या पाच वर्षांत डिजीटल जगात आपली जागा निर्माण केली. अवकाश संशोधनात जागतिक पातळीवर भारताला मोठे यश मिळाले.’

” ही देशाची १६ वी लोकसभा असून मला आज आभिमान वाटत आहे. लोकसभेच्या सभागृहात पहिल्यांदा महिलांची संख्या ४४वर पोहचली आहे. ”

देशातील जनतेने इतर सरकारांच्या तुलनेत माझ्या सरकारवर दाखविलेला विश्वास पाहून, मला नेहमीच देशाचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर जवळपास तीन दशकानंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार २०१४ मध्ये स्थापन झाले आहे. पूर्ण बहुमताची सरकार असून  काँग्रेसचे गोत्रचे नसलेली सरकार आहे. याआधी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात देखील अशी मिळती जुळती सरकार आली होती. ती सरकार देखील काँग्रेसचे गोत्र नसलेली सरकार होती.

Related posts

स्वातंत्र्याची व्याख्या सोयीनुसार बदलली आहे, सामनातून भाजपवर रोख

News Desk

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तन यात्रे’ला सुरुवात

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज काय ?

News Desk