नवी दिल्ली | पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव पदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदा प्रियांका गांधीना राजकीय जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आता मोठा चेहरा मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचा भार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या खांद्यांवर देण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
INC COMMUNIQUE
Appointment of General Secretaries for All India Congress Committee. pic.twitter.com/zHENwt6Ckh
— INC Sandesh (@INCSandesh) January 23, 2019
प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी आज (२३ जानेवारी) पूर्ण झाली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातच मर्यादित होत्या. प्रियांका या केवळ आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारा दरम्यान दिसत होत्या. परंतु आता प्रियांका यांना अधिकृतरित्या पक्षात सक्रीय होणार आहेत. त्यामुळे प्रियांका यांच्या येण्याने काँग्रेसला ते लोकसभा निवडणुकीत लाभ होईल हे येणारा काळच ठरवेल.
Priyanka Gandhi Vadra appointed Congress General Secretary for Uttar Pradesh East. pic.twitter.com/rkl57AFVzw
— ANI (@ANI) January 23, 2019
प्रियांका गांधी यांची महासचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आनंद व्यक्त करण्यात आला आहे. प्रियांका यांचे अभिनंदन करणारी पोस्ट फेसबुक शेअर केली आहे.
Robert Vadra in a Facebook post congratulates wife Priyanka Gandhi Vadra on being appointed as Congress General Secretary for Eastern Uttar Pradesh. pic.twitter.com/9gux2pXfk2
— ANI (@ANI) January 23, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.