HW Marathi
राजकारण

प्रियांका गांधींच्या ट्विटर अकाऊंटला जोरदार प्रतिसाद

नवी दिल्ली | प्रियांका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासचिव पद स्वीकारल्यानंतर अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींचा आज (११ फेब्रुवारी) रोड शोला सुरुवात झाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत देखील सोशल मीडियाला प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते आहे. यानुसार भाजप आणि काँग्रेससह अनेक राजकीय बेडे नेते मंडळी ट्विटरवर आहेत. यात आता अजून एका राजकीय नेत्यांची यात भर पडली आहे. प्रियांका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आज (११ फेब्रुवारी)पासून सुरू झाले आहे.

प्रियांकांचे ट्विटवर आगमन झाल्याची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने ट्विट करून सांगिले आहे. आता ट्विटरवर आल्यामुळे तुम्ही आता त्यांना फॉलो करण्यासाठी झुंबड उडाली आहे. प्रियांकाचे अकाऊंट ओपन होताच क्षणी ५२ हजार जणांनी त्यांना फॉलो झाले आहे. प्रियांका गांधी वाड्रा या नावावे ट्विटवर त्यांचे अकाऊंट सुरू झाले आहे. या अकाऊंटवर अजून एक ही ट्विट केलेले गेले नाही. परंतु काँग्रेस, राहुल गांधी, अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, अशोक गहलोत, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना फॉलो करत आहेत.

 

Related posts

न्यायमूर्ती लोयाच्या हत्येचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात

Pooja Jaiswar

राफेल विमानावरून पवारांचा युटर्न

News Desk

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

News Desk