HW Marathi
राजकारण

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

हिंगोली | शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर टारफे यांनी बांगर यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच बांगर यांच्या अटकेसाठी टारफे यांनी हिंगोलीत आंदोलन केले. बांगरविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत सेनेकडून औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान औंढा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचे निदर्शनास आले. ध्वनीक्षेपणावर दोन ते अडीच हजार लोकांसमोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन फिर्यादीचा अवमान केल्या प्रकरणी औंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक सिध्देश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Related posts

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

Ramdas Pandewad

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

News Desk

जस्टिस लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असमाधानकारक | संजय निरुपम 

News Desk