नवी दिल्ली | राफेल डीलवरून आज (४ जानेवारी) संसदेत संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी काँग्रेसवर तोफ डागली. सीताराम यांनी राफेल डीलवर उत्तर देताना म्हटल्या की, “आम्ही संरक्षणासाठी डील आणि संरक्षणाचे डील करणे यामध्ये फरक आहे.” अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. राफेल डीलसाठी ८ वर्षे का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आले नाही?, असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले.
Defence Minister in Lok Sabha: There is a difference between defence dealings and dealing in defence. We don't do defence dealings. We deal in defence with national security as a priority. pic.twitter.com/wfPWbEd7VC
— ANI (@ANI) January 4, 2019
संसदे राहुल गांधींचे मोदींना चर्चेचे आव्हान
संसदेचे हिवाळी अधिवेश सुरू झाल्यापासून राफेल डीलचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी राफेल डीलवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. राफेल डीलबद्दल मोदींनी २० मिनिटे चर्चा करावी, असे आव्हान राहुल यांनी दिले होते.
Defence Minister in Lok Sabha: The first aircraft will be delivered in September 2019 and 36 aircraft will be delivered in the year 2022. The process of negotiation was finished in 14 months. #Rafale pic.twitter.com/V0FsmB03yx
— ANI (@ANI) January 4, 2019
राफेलचे पहिले लढाऊ विमान सप्टेंबर येणार
यावेळी त्यांनी यूपीए सरकारने राफेल खरेदीचा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्नही सीताराम यांनी उपस्थित केला. हवाई दलाला तातडीने लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. काँग्रेसला २०१४ पर्यंत राफेल डील पूर्ण का करता आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात एकही विमान देशात का आणता आले नाही, याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असा उलट सवाल करून सीतारामन काँग्रेसची कोंडी करण्याच प्रयत्न केला. राफेलचे पहिले लढाऊ विमान सप्टेंबर २०१९ मध्ये दाखल होईल. तर उर्वरित विमाने २०२२ पर्यंत दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले. जेट विमाने खरेदी करण्याचा काँग्रेसचा हेतू नव्हता, असा आरोप त्यांनी केला आहे.
Defence Minister during debate on Rafale jet deal in Lok Sabha: China and Pakistan are building a bigger fleet. The UPA government wanted only 18 flyaway fighter jets. UPA created a deadlock. pic.twitter.com/uYHPZ23QjZ
— ANI (@ANI) January 4, 2019
‘चीनने त्यांच्या ताफ्यात जवळपास ४ हजार विमाने दाखल केली आहेत. परंतु काँग्रेसने याच कालावधीत काय केले? ज्या १२६ विमानांचा उल्लेख केला जात आहे, ती कुठे आहेत?’, अशा प्रश्नांच्या फैरी संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसवर झाडल्या. त्यांच्या निवेदनादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. देशाच्या चारही बाजूंना संकटे आहेत. परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपण प्रत्येक संकटासाठी सज्ज राहायला हवे, असे सीतारामन म्हणाल्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.