HW News Marathi
राजकारण

…तर राफेल संबधित सर्वच तुरुंगात जातील | पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद | संसदेत राफेल विमानाची नेमकी किंमत किती असा प्रश्न विचारताच ६७० कोटी असे, लेखी उत्तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिले. या उत्तरावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जर राफेलची किंमत ६७० आहे, तर नरेंद्र मोदी १६७० कोटीने कसे विकत घेतात, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे. पुढे ते म्हणाले हे कि, हा किक बॅकचा प्रकार आहे. म्हणजे पैसे परत आपल्याच खिशात आणण्यात आल्याचे दिसते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणी जर चौकशी झाली तर सर्वच तुरुंगात जातील,असेही चव्हाण एका माध्यमांशी बोलत होते.

पुढे चव्हाण असेही म्हणाले की, त्याकाळात मी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असताना राफेल विमान खरेदी व्यवहाराची मला माहिती होती. युरोत असल्याने राफेलची किंमत २००४ मध्ये ५५० ते ६६० कोटींच्या जवळपास होती. कालावधीने किंमतीत थोडा बदल अपेक्षित होता. पण ती थेट तिप्पट वाढणे शक्यच नव्हते. कोणताही खरेदी व्यवहारात निर्णय घेण्यात पाच मंत्र्यांचा समावेश असतो. परंतु राफेल खरेदीत असे झाले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हटले आहेत. एप्रिल महिन्यात विमानाच्या भागांची कंपनी स्थापना केली आणि एप्रिलमध्येच मोदींनी संरक्षणमंत्री किंवा अन्य कोणालाही विश्वासात न घेता राफेल खरेदीचा करार केला. मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाण्याच्या एक दिवस आधी परराष्ट्र खात्यातील सचिवाने म्हटले होते की, असे व्यवहार पंतप्रधान करत नाहीत. तरीही परराष्ट्र, संरक्षण मंत्री नसताना मोदींनी व्यवहार केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभेचे अधिवेशन संपताच सुरु झाली राजकीय आकडेमोड

News Desk

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk
मनोरंजन

बॉलिवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Gauri Tilekar

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानचा आज ५३ वा वाढदिवस आहे. शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या कुटुंबात झाला. शारुखनचे बालपण आपल्या आजीजवळ मंगळुरूमध्ये गेले. यानंतर शाहरुख दिल्लीत त्याच्या आई-वडिलांकडे आला. शाहरुखची आई मूळ हैदराबादची असून त्याचे वडील हे मूळचे पेशावरचे आहेत. शाहरुख १५ वर्षांचा असताना त्याच्या वडीलचे कॅन्सरने निधन झाले.

लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या किंग खानने आपल्या कामाची सुरुवात टीव्ही सीरियल मधून केली. त्याने १९८८ मध्ये ‘फौजी’ ही पहिली सीरियल केला. त्यानंतर सर्कस सीरियल केले आणि हेमा मालिनींनी शाहरुखला त्यांच्या आशियाना या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख दिल्लीत शिफ्ट झाला. आशियाना सिनेमातील काम लोकांना आवडल्यानंतर खऱ्या अर्थाने शाहरुख खान बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. मग शारुखानला यश राज चोप्राचे डर ,बाजीगर अशा एका पाठोपाठ एक चित्रपटात काम मिळाले.

यश राज यांचा डर या चित्रपटात शाहरुख खानने व्हिलनचे काम केले. शाहरुख खानने व्हिलनचे काम करून देखील प्रक्षेकांची मने जिंकली. त्याच्या या भूमिकेसाठी शाहरुख खानला बेस्ट व्हिलन पुरस्कार मिळाले. व्हिलनची छाप शाहरुख खानने सोडलीच मात्र त्याने दिल तो पागल है, दिल से, वीर झारा, या चित्रपटांमध्ये अतिशय लोकप्रियता मिळवली. म्हणून त्यानंतर शाहरुख किंग ऑफ रोमांस म्हणून ओळखला जाऊ लागला. यश राजच्या चित्रपटांसोबत आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मोहब्बतें’, ‘रब ने बन दी जोडी’ या चित्रपटानेही शाहरुख खानला यशाच्या उंचीला गाठले. देवदास (२००२) मे एक व्यसनी, स्वदेश (२००४) में एक नासा वैज्ञानिक, चक दे इंडिया (२००७) में हॉकी प्रशिक्षक, माय नेम इज खान (२००७) में एक अस्पेर्गेर सिंड्रोम से पीड़ित व्यक्ति या सर्व सिनेमांमध्ये शाहरुखने प्रेक्षकांना आपल्या भूमिकेने घायाळ केले.

अशा अनेक सिनेमांनी शाहरुखला किंग खान म्हणून ओळख मिळवली. अपार यशानंतर तो आपल्या वैयक्तिक जीवनातही किंग ठरला. गौरी आणि शाहरुखची भेट एका डान्स पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले आणि २५ ऑक्टोबर १९९१ ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले. शारुखनला तीन मुलं आहेत. आर्यन खान, सुहाना खाना आणि अबराम खान.

इ.स.१९९२ दीवाना

इ.स.१९९३ माया मेमसाब

इ.स.१९९४ कभी हाँ कभी ना सुनील

इ.स.१९९५ करण अर्जुन

इ.स.१९९७ कोयला

इ.स.१९९८ दिल से

इ.स.१९९९ बादशाह

इ.स.२००० फिर भी दिल है हिंदुस्तानी

इ.स.२००१ वन टू का फोर

इ.स.२००२ देवदास

इ.स.२००३ चलते चलते

इ.स.२००४मैं हूं ना

इ.स.२००५ पहेली

इ.स.२००६ कभी अलविदा ना कहना

इ.स.२००७ चक दे! इंडिया

इ.स.२००८ रब ने बना दी जोडी

इ.स.२०१० माय नेम इज खान

इ.स.२०११ रा.वन

इ.स.२०१२ जब तक है जान

इ.स.२०१३ चेन्नई एक्सप्रेस

इ.स.२०१४ हॅपी न्यू इयर

इ.स.२०१५ दिलवाले

इ.स. २०१६ फॅन

इ.स. २०१७ रईस

 

Related posts

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

News Desk

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk

लक्ष्मीकांत-प्रिया यांची हिट केमिस्ट्री

News Desk