मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (२५ एप्रिल) त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अहमदनगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला.
Congress Leader Radhakrishna Vikhe Patil resigns as Leader of Opposition(LoP) in Maharashtra assembly (file pic) pic.twitter.com/tPlgZRpsUK
— ANI (@ANI) April 25, 2019
राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळेच विखेंनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आज तो स्वीकारल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आपण विखेंशी बोललो असून, काँग्रेसचे काम करण्यासाठी ते अनुकूल असल्याचे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश असतानाही त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने करण्यात येत होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.