HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

मुंबई | न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा काँग्रेस पक्षाला रोखता येत नसल्यामुळे राहुल गांधीसह त्यांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटवत असल्याचा आरोप दाणवे यांनी केला. जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही आणि भाजपही विकासाच्या मुद्द्यावरून दूर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती . तसेच राहुल गांधी यांनी दीडशे खासदारांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राहुल गांधींनी या विषयात घाणेरडे राजकारण केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बदनामीचे कारस्थान केल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विनोद तावडेंनी मुख्यमंत्र्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये | संदीप देशपांडे

News Desk

RamMandir : अयोध्येतील व्यापाऱ्यांच्या विरोधाची तलवार म्यान

News Desk

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk

छत्तीसगढ | विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सोमवारी सकाळी सुरुवात झाली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर छत्तीसगढ विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. हे सर्व मतदारसंघ आठ नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आहेत. छत्तीसगढमधील जनतेने घराबाहेर पडून मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावण्याला आहे.

मतदानाला २४ तास शिल्लक असताना नक्षलवाद्यांनी एका पाठोपाठ एक सहा आयईडीचे स्फोट घडवले होते. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. तर मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडी देखील पहायला मिळाल्या आहेत. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष घनराम साहू यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने छत्तीसगढमध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १८ जागांसाठी ६५० मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. नक्षली हल्ल्याच्या शक्यतेने अनेक ठिकाणी हेलिकॉप्टने अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. गेल्या १० दिवसात या भागातून ३०० आयईडी सापडले आहेत. मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी एक लाख जवान तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांनी बिजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर, कोंटा येथील नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी दिले ‘हे’ तीन नवे पर्याय

Aprna

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

News Desk