HW News Marathi
राजकारण

राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत ! – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई | कॉंग्रेसच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सध्या प्रचंड मेहनत घेत आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा अधिक, त्यांचा पंतप्रधान होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले असले तरी हा त्यांचा विचार आहे. मात्र आम्हाला राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत असे वाटते, असेही खर्गे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच आगामी निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. नरेंद्र मोदी संघाची विचारधारा राबवत आहेत. ही विचारधारा देशासाठी घातक आहे, असेही ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपेंद्र कुशवाह यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk

पुण्यात होणारी पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी; राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टद्वारे आवाहन

Aprna

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

News Desk