नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. ‘चौकीदार चोर है’ प्रकरणात राहुल गांधींनी दाखल केलेले हे तिसरे प्रतिज्ञापत्र आहे. राफेल करारप्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला खडे बोल सुनावले. त्यानंतर राहुल गांधी यांनी “आता सर्वोच्च न्यायालयदेखील म्हणत आहे कि चौकीदार चोर है” असे म्हटले होते. मात्र, न्यायालयाने असे कोणतेही विधान न केल्याचे म्हणत भाजपने यावर आक्षेप घेतला होता.
Contempt petition against Congress President Rahul Gandhi: Rahul Gandhi tenders unconditional apology to the Supreme Court pic.twitter.com/qLwYoVIjLu
— ANI (@ANI) May 8, 2019
भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांनी यापूर्वी २ वेळा आपल्या त्या विधानाबाबत खेद व्यक्त केला होता. आता पुन्हा राहुल गांधी यांनी या प्रकरणी ३ पानी प्रतिज्ञापत्र दाखल करत सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. दरम्यान, शुक्रवारी (१० मे) या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेत आपण चुकीच्या पद्धतीने भाष्य केल्याचे मान्य करत राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे.
Congress President Rahul Gandhi has filed a three page affidavit stating his unconditional apology to Supreme Court for his remark on Rafale deal, "Supreme Court has accepted that "chowkidaar chor hai" https://t.co/UGBf8PR8D2
— ANI (@ANI) May 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.