मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक राजकीय पक्षांनी जागा वाटपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता एक वृत्तवाहिनीने वर्तविली आहे. तसेच राहुल गांधी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ हे नेहमीच काँग्रेसचे बालेकिल्ला मानला जात आहेत. तरी देखील राहुल यांच्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचा पर्याय दिला जात आहे.
यामध्ये नांदेड, अमेठी आणि मध्य प्रदेशातील एका जागेचा समावेश आहे.दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असे संकेत मिळत आहेत. राहुल गांधी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. तसेच भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.