HW News Marathi
राजकारण

HW Exclusive : “राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून काढावी”, प्रतापराव जाधवांचा टोला

मुंबई | “राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही काश्मीर, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून काढली असती. तर खऱ्या अर्थाने भारत जोडो यात्रा या नावाला योग्ट वाटले असते”, असा टोला शिंदे गटाचे नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत काँग्रेसला (Congress) लगावला आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा आज (10 नोव्हेंबर) चौथा दिवस आहे. सध्या भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आहे. तर पुढच्या आठवड्यात भारत जोडो यात्रा बुलढाण्यात येणार आहे. प्रतापराव जाधव यांनी एच.  डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा, राहुल गांधी, ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीनी प्रतापराव जाधव यांना काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुलढाण्या जिल्ह्यात येणार असून ही यात्रा बुलढाण्यात तीन दिवस असणार आहे, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “”राहुल गांधी यांच्या यात्रेला भारत जोडो हे जे नाव दिले. हेच  हास्यस्पद आहे. राहुल गांधींना जर भारत जोडो यात्रा काढायची असेल तर काँग्रेसच्या मागच्या काळामध्ये भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला. काश्मीरपासून पीओके बाजूला गेले, बांग्लादेश तुटला गेला. यामुळे राहुल गांधींची भारत जोडो पद यात्रा ही काश्मीर, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून काढली असती. तर खऱ्या अर्थाने भारत जोडो यात्रेचे संयुक्त नाव वाटले असते. आता ज्यांची यात्रा सुरू आहे. फुटलेला पक्ष हा पक्ष जोडो ही यात्रा सुरू आहे. राहुल गांधींची सभा पुढे येते आणि मागे काँग्रेसचे लोक कुठे भाजपमध्ये दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याच्या बातम्या येत आहेत.  प्रसिद्धसाठी केला हा इवेंट आहे. ठिका आहे ही यात्रा बुलढाण्यात येईल जाईल. आमचेही कार्यक्रम पुढच्या काळात होतील. लोक त्यावर निर्णय घेतील. पण, भारत काही फुटलेला नाही की त्याला राहुल गांधींनी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आम्ही जाऊ भारत जोडो”

बुलढाणा जिल्ह्यातील लोकांचा मनस्थाप अशी टीका अरंविद सावंतांनी प्रतापराव जाधव केली, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर ते म्हणाले, “अरंविद सावंत हे जे आहेत, तुम्हाला माहिती आहे का?, यांचा लोकांचा काही संबंध नाही. हे केवळ मातोश्रीच्या पुढे जाऊन हाजी हाजी नेत्यांपैकी एक आहे. आणि त्याच भरोश्यावर त्यांचे कतृत्व आहे. खऱ्या अर्थाने हेच लोक शिवसेनेला ऐवढे मनस्थाप ठरले होते. मग, त्या अरंवित सावंत असतील, अनिल परब असतील, उद्धव ठाकरेंच्या जवळचची चाडाळ चौकडी असतील. पक्षाला ऐवढी मनस्ताप झाली होती की, यांच्या मनस्थापामुळे शिवसेनेतील 40 आमदार 12 खासदार आणि लाखोच्या संख्येने शिवसैनिक, शिवसेनेचे आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंपासून दूर गेलीत. हेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला असलेले मनस्थाप आहेत.”

आदित्य ठाकरेंना खरीब पिक आणि रबीची पिके कधी घेतात, माहिती आहे का?

एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंचा दौरा तुमच्या जिल्ह्यात झाला, यावर प्रतापराव जाधव प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “असे  काही नाही, राजकीय पक्ष आहे त्यांच्यासभा होत असतात. त्यांच्यासभा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्यांची सभा होती, आमच्याही सभा त्यांच्या भागात होतात. पण, मला एक समजते की, या माणसाला शेतीचे अजिबात ज्ञान नाही. ज्याला खरीब पिक आणि रबीची पिके कधी घेतात. हे जर कोणत्या पत्रकारांनी विचारले. तर तेही सांगता येणार नाही. आणि असा माणूस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकतो. खरे तर ही फार मोठी हास्यपद, अशा प्रकारची त्यांचे जे चालेले आहे. हा तशालाच एक प्रकार असल्याचे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा जर जाणून घ्याच्या असतील तर त्याला शेतकरी व्हावे लागते. आपल्याकडे म्हण आहे, जावी ज्याच्या वंशी, तेव्हा कळे, शेतकऱ्यांची मुळे आणि शेतकरींच्या ज्या व्यस्था समजू शकतात. अशा हाय फाय वेशात जाणारे, रात्रभर मुंबईतील हॉटेल चालू ठेवून तरुणांनी दंगा मस्ती त्या ठिकाणी करावी. यासाठी प्रयत्न करणारी लोक त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यस्था काय समजणार.”

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सत्ता गेल्याने अस्वस्थ

12 ते 15 आमदार शिंदेंच्या संपर्कात आहे, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी प्रतापराव जाधव विचारला, “शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, खासदार, काही काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पण काही लोक सत्ता गेल्यामुळे अतिशय अस्वस्थ झालेले आहेत. आणि हे दिवसा जरी भेटत नसले तरी रात्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमचे जे प्रमुख मंत्री असतील. यांना ते रात्री अंधारात भेटतात. त्यांच्या बंगल्यावर जाऊनही ते भेटतात. सह्याद्रीवर बैठका असल्या तरी त्या ठिकाणी जाऊनही भेटतात. फार मोठ्याप्रमाणा त्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. पण, त्यांचे व्यक्तीक मतदार संघातील स्थानिक काही प्रॉब्लेम असेतली, यामुळे लोक तिकडे थांबलेली आहेत.”

लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल

संजय राऊतांना जामीन मिळाला आहे, हे तुम्ही काय बोलात, असा प्रश्न प्रतापराव जाधव यांनी एच. डब्ल्यू मराठीच्या प्रतिनिधींनी प्रतापराव जाधव म्हणाले, “एखाद्या आरोपीला अटक करणे किंवा त्याचा जामीन मिळणे. ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. यामुळे मी यावर फार काही भाष्य करणार नाही. पण, मला ऐवढेच बोलायचे आहे की, पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्यावर ईडीने जी काही कारवाई केली. हे पत्राचाळ प्रकरणे हे दाऊदच्या अनेक हस्तक लोकांशी संबंधित असणारे हे प्रकरण आहे. आणि दुर्दैव आहे. आणि त्या बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून घेणारे संजय राऊत सारखा माणूनस शिवसेनेचा नेता दाऊदच्या हस्तगत लोकांशी संबंध असल्यामुळे पत्राचाळ प्रकरणात अडकलेला आहे. ठिक आहे त्यांची जामीन झालेली आहे. अजून त्याचा निकाल लागलेला नाही. त्याठिकाणी न्यायालयीन लढाई ढली जाईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल.”

 

 

Related posts

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

swarit

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मायावतींचा भाचा आकाश आनंद यांचा राजकारणात प्रवेश

News Desk