HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी चिंचवड विधानसभेतील उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Chinchwad Bypoll Election) तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटे यांनी चिंचवडमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. परंतु, राहुल कलाटेंनी पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णयावर ठाम असून चिंचवडमध्ये माझा विजय होणार, असा विश्वासही त्यांनी आज (10 फेब्रुवारी) माध्यमाशी बोलताना म्हणाले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर बंडखोर राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीने विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. परंतु, राहुल कलाटेंचे मन वळविण्यात महाविकास आघाडीला अपयश आले. आणि राहुल कलाटे हे निवडणूक लढविण्यास ठाम असल्याचे सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे चिंचवड विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. यामुळे आता चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related posts

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

Aprna

सरकार पाडून दाखवा? अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना!

News Desk

उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाची ना !

News Desk