HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे यांची ‘मातोश्री’वर सदिच्छा भेट

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (५ जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला कडवे आव्हान देणार असल्याची चर्चेला उधाण आले आहे.

 

कधी राज ठाकरे हे त्यांच्या व्यंगचित्रांमधून शिवसेनेचा समाचार घेतात. तर उद्धव ठाकरे हे पोस्टर आणि भाषणातून एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडतात. परंतु आज या दोन्ही भावांच्या भेटीमागचे कारण राजकीय नसून तर राज ठाकरेंचे अमित यांच्या विवाह सोहळ्यांचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी उद्धव यांची भेट घेटली आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेसोबत २७ जानेवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत.

 

कोण आहे मिताली बोरुडे

मिताली बोरुडे फॅशन डिझायनर असून फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी असून गेल्या काही वर्षांपूर्वी या दोघी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

राज आणि उद्धव यांची मातोश्रीवरील भेट

याआधी २९ जुलै २०१६ रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतली होती. २७ जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाल्यानंतर राज यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याआधी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आल्यानंतर राज यांनी उद्धव यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्याचे पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे”

Manasi Devkar

संघाने देखील मोदींची साथ सोडली, त्यांचे जहाज आता डुबत आहे !

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk